Sign In

Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी | Free PDF Download

Ganpati Stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी | Free PDF Download

गणपती स्तोत्र (संकटनाशन स्तोत्र)

प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम् आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाष्टकम् ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर:
नच विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकरः प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम||

गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशी बारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ||६||

जपता गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

जयजयाजी गणपती (गणपतीस्तोत्र)

जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।

तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।
विष्णू शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥

तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।
सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥

मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।
देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥

माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे ।
संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥

तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय ।
तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणपती ॥

गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा l
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥

भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥

विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥

नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता ।
नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥

नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥

मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण ।
लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥

मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक ।
भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥

मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।
अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥

हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन ।
विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥

त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात ।
स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥

होईल सिद्धी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥

इति श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्। श्री गजाननार्पणमस्तु।

Download PDF