Best 25 Husband Birthday Wishes In Marathi
आजचा दिवस तुमच्या जोडीदाराच्या वाढदिवसाचा दिवस असावा आणि तुम्ही विचारपूर्वक त्याच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आयोजित केली असेल! “पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा” हे वाक्य त्याची पत्नी रात्री बारा वाजता उठल्यावर बोलते. म्हणून, आम्ही या पोस्टमध्ये पतींना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा समावेश या पोस्टमध्ये केला आहे जेणेकरुन तुम्हाला त्यांच्या विशेष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्या लागतील. या व्यक्तीला त्यांच्या जोडीदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस मराठीत पाठवू शकतात.
पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि
माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस !
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील आहात !
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जशी बागेत दिसतात फुले छान
तशी दिसते तुझी माझी जोडी छान
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते,
पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे !
हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे !
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे !
तुला स्वीट हॅपी बर्थडे
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही !
हॅप्पी बर्थडे डियर
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो कोडगा आहे
जणु माझा पोरगा आहे
कधी तो माझा पप्पा आहे
मनातला नाजूक कप्पा आहे..
थोडासा तो चिडका आहे
पण मायेचा झरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे..
लहानांशी त्याची गट्टी आहे
थोडासा तो हट्टी आहे
त्याला वाटतं तो धाडसी आहे
मला वाटतं तो आळशी आहे
थोडासा तो हळवा आहे
माझ्या जिवनाचा वारा आहे..
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो भावनिक आहे
राग त्याचा क्षणिक आहे
नव्या कल्पनेत उडणारा आहे
जुन्या आठवणीत रमणारा आहे
नव्या स्वप्नात रंगणारा आहे
त्याच्यामुळे सौख्य घरा आहे..
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो ज्ञानी आहे
सुखी आणि समाधानी आहे
संयम थोडासा कमी आहे
जिभेनं थोडा कडवा आहे
पहिल्यापेक्षा बरा आहे
मी कुठं म्हणते हिरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे..